हसूल तलावाची पाणी पातळी २५ फुटांवर !

श्रावणाच्या अखेरीस आणि गणरायाच्या आगमनाला झालेल्या जोरदार पावसामुळे हर्मूल तलावाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होऊन पातळी 25 फुटांवर गेली आहे. तलाव परिसर पाण्याने भरला असून, ओव्हरफ्लो होण्यासाठी अवघ्या 3 फूट पाण्याची आवश्यकता आहे. हसूल तलावाच्या पाणीसाठ्याने शहरातील 14 वॉर्डाच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.

शहरात श्रावण महिन्यात चांगला पाऊस झाल्यामुळे हसूल तलावाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली. ऑगस्टच्या मध्यान्हामध्ये तलावाने तळ गाठला होता. तरी देखील तलावातून पंपाच्या साह्याने पाणीपुरवठा होत होता. मात्र, पावसाने जोरदार हजेरी लावत पाण्याचे संकट दूर केले. शहरासह परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस हसूल तलावाची पाणीपातळी 20 फुटांवर पोहचली. तलावाच्या पाणीसाठ्यात वाढ होत असल्यामुळे 14 वॉडाँना सुरळीत पाणीपुरवठा सुरू झाला. हर्सल येथे नव्याने उभारण्यात आलेल्या जलशुद्धीकरण केंद्रातून 7 एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करून हे पाणी वॉडाँना पुरविले जात आहे. यामुळे जुन्या शहरातील घाटी रुग्णालय, लेबर कॉलनी, आरेफ कॉलनी, सुभेदारी विश्रामगृह, गणेश कॉलनी, कटकट गेट, रोशनगेट या भागातील १४ वॉर्डाच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. तलावातून या भागांना मुबलक पाणीपुरवठा होत असून, पाण्याचा गॅप कमी केला जाणार भागातील जलकुंभातून पाणीपुरवठा आहे. दिल्लीगेट आणि शहागंज करणे अत्यंत सुलभ झाला आहे.

तलाव ओव्हरफ्लोसाठी 2 फूट पाण्याची आवश्यकता

हसूल तलावातील पाण्याची पातळी वाढत चालली आहे. सध्या तलावात नदीपात्राद्वारे पाणी येत आहे. रविवारी संध्याकाळपर्यंत तलावातील पाणीपातळी साडेपंचवीस फुटांवर पोहचली होती. तलाव भरून वाहण्यासाठी 28 फूट पाण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे आणखी 3 फूट पाणीसाठा झाला तर तलाव ओव्हरफ्लो होणार आहे. जोरदार पावसाने हजेरी लावली तर तलाव ओव्हरफ्लो होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.