जालन्यातील व्यापाऱ्याला दोन कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या दोन खंडणीखोरांच्या चंदनझिरा पोलिसांनी मुसक्या आवळल्या. ही कारवाई 13 नोव्हेंबर रोजी करण्यात आली. दरम्यान, खंडणीखोरांच्या ताब्यातून गावठी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतूस पोलिसांनी जप्त केले.
12 नोव्हेंबर रोजी चंदनझिरा पोलीस ठाणे हद्दीमध्ये कणक हॉटेलमध्ये फिर्यादी श्लोक अग्रवाल हे बसलेले असताना आरोपी चंद्रकांत जाधव, विक्की मांडुळे व एका अनोळखीने दोन कोटी एक गावठी पिस्टल, काडतूस जप्त खंडणीची मागणी केल्यामुळे चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संम्राटसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप हे तपास करीत असताना मिळालेल्या माहितीवरून आरोपी चंद्रकांत विष्णु जाधव व विक्की मांडुळे यांना ताब्यात घेऊन एक गावठी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतूस जप्त केले. ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मागदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल शिंदे, सचिन सानप, पोहेकॉ प्रशांत देशमुख, गजानन जारवाल, साईनाथ पवार, कृष्णा तंगे, पोना राजेंद्र पवार, शरद पवार, नवनाथ पाटील, रमेश काळे यांनी केली.