काही तरी करण्याची गरज! YouTube वरील अश्लील कंटेंटवरून सर्वोच्च न्यायालयाची केंद्राला नोटीस

YouTube Supreme Court

सर्वोच्च न्यायालयाने ( Supreme Court ) मंगळवारी युट्यूबवरील ( YouTube ) अश्लील कंटेटसंदर्भात नियमन करण्याची गरज अधोरेखित केली. ‘काहीतरी करण्याची गरज आहे’ ( योग्य पावलं उचवलण्याची गरज) असं न्यायालयानं म्हटलं आहे. युट्यूबर रणवीर अलाहबादिया याच्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं हे निरीक्षण नोंदवलं. विनोदी कलाकार समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ ( India’s Got Latent ) शो वेळी रणवीर अलाहबादियाने ( Ranveer Allahbadia ) केलेल्या अश्लिल विधानावरून त्याच्याविरुद्ध दाखल केलेले ‘एफआयआर’ एकत्र करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं चिंता व्यक्त करत सरकारला यासंदर्भात हालचाल करण्याचे निर्देश दिले होते.

डोक्यातील घाण तिथं ओकली; ही अश्लीलता नाही तर काय? SC नं रणवीर अलाहाबादियाला खडसावलं