मराठी नाटक व सिनेमा एकाच थिएटरमध्ये दाखवणार, राज्य सरकारकडून चाचपणी

राज्यातील प्रत्येक शहरात चित्रपटांसाठीची थिएटरची संख्या वाढण्याची गरज आहे. यासाठी सध्या असलेल्या सिंगल स्क्रीन थिएटरना काही सवलती देता येईल का, तसेच मराठी नाटक आणि चित्रपट एकाच थिएटरमध्ये दाखवता येईल का याबाबत विचार करावा, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नगरविकास विभागाच्या कामकाज नियोजनाबाबत बैठक झाली. या बैठकीत विविध विषयांचा आढावा घेण्यात आला. राज्यातील शहरांच्या विकासासाठी निधी खर्च करण्याची आवश्यकता आहे. शहरातील पायाभूत विकासासाठी भांडवली गुंतवणूक करावीच लागणार आहे. मात्र यासाठी निधी उभारण्यासाठी नावीन्यपूर्ण आर्थिक पर्याय उभारले पाहिजेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

नियोजन प्राधिकरणाचे सक्षमीकरण

राज्यातील विविध नियोजन प्राधिकरणांचे सक्षमीकरण करून त्यांचे कामकाज पंपनीच्या धर्तीवर करावे, असेही त्यांनी सांगितले.