गेल्या काही महिन्यांपासून डॉलरच्या तुलनेत रुपयांची घसरण सुरूच आहे. गुरुवारी विक्रमी घसरण पाहायला मिळाली. एक अमेरिकन डॉलरसाठी 85.08 रुपये मोजण्याची वेळ आली आहे. रुपयाच्या घसरणीमुळे आयात महागणार आहे. तसेच इंधन दरवाढही आणखी भडकण्याची शक्यता आहे. रुपयाची आजपर्यंतची सर्वाधिक निच्चांकी घसरण झाली आहे. चलन बाजारात रुपया 12 पैशांनी घसरला असून एका डॉलरच्या तुलनेत त्याची 85.06 रुपयांच्या खाली घसरण झाली आहे. याचा थेट सर्वसामान्य नागरिकांवर परिणाम होणार आहे.