दापोली येथील जामगे धरणा नजिक रस्ता खचला; सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वाहतुकीस मार्ग बंद

दापोली आणि खेड या दोन तालुक्यांना जोडणारा खेड-जामगे-शिवतर-सोवेली (प्रजिमा 12) हा मार्ग जामगे धरणानजिक खचल्याची घटना घडली. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतुक ही प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या कारणाने सार्वजनिक बांधकाम विभागाने बंद केली आहे.

दापोली आणि खेड या दोन तालुक्यांना जोडणारा हा महत्वाचा मार्ग आहे. या मार्गामुळे दापोली, मंडणगड आणि खेड तालुक्यातील काही गावे एकमेकांना जोडली आहेत. तसेच चिपळूण आणि रत्नागिरीकडे जाण्यासाठी सुद्धा हा मोर्ग सोईस्कर ठरतो. या मार्गाजवळून जाणाऱ्या विसापूर गावाच्या हद्दीत जलसंधारण विभागाकडून धरण बांधण्यात आले आहे. या धरणाजवळून जाणाऱ्या जुण्या मार्गाचा 150 मीटर पेक्षा जास्त लांबीचा रस्ता एका बाजूने खचला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतुक बंद करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाने दिले आहेत.