डॉ. मनमोहन सिंग यांच्या अस्थींचे विधिवत विसर्जन

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या अस्थी दिल्लीतील मजनू का टिला येथील गुरुद्वारात आणण्यात आल्या. येथे कीर्तन, पठण आणि प्रसादानंतर त्यांच्या अस्थींचे कुटुंबीयांनी यमुनेत विसर्जन केले.

आज भारतमातेचे सुपुत्र आणि देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या अस्थिकलशाचे विसर्जन मजनू का टिला गुरुद्वाराजवळील यमुना घाटावर विधिपूर्वक करण्यात आले. मनमोहन सिंग यांची देशसेवा आणि समर्पण सदैव स्मरणात राहील, अशा भावना व्यक्त करत काँग्रेसने एक्सवरून अस्थिकलश विसर्जनाची माहिती आणि व्हिडीओ पोस्ट केला आहे.