![bindi](https://www.saamana.com/wp-content/uploads/2023/01/bindi-696x447.gif)
एका टिकलीमुळे नवराबायकोचं नातं तुटलं. पत्नी नवऱ्यापासून दुरावली. आग्रा येथील या अजब घटनेची चर्चा रंगली आहे. आग्य्राच्या जगनेर भागात राहणाऱ्या तरुणाचे लग्न दोन वर्षांपूर्वी झाले. त्याच्या पत्नीला रोज नवनवीन रंगीबेरंगी टिकल्या लावायची आवड होती. तिच्या टिकल्यांच्या मागणींमुळे नवरा त्रस्त झाला. एके दिवशी नवरा टिकल्या आणायला विसरला. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला. तो विकोपाला पोचला. पत्नी रागाने माहेरी निघून गेली. सहा महिने झाले तरी ती परत येईना. त्यामुळे नवऱ्याने पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी कुटुंब समुपदेश्ना सेंटरला पाठवली.