दक्षिणेकडील राज्यात पावसामुळे शेवग्याच्या लागवडीला फटका बसला. तर, राज्यात यंदा लांबलेला परतीचा पाऊस आणि त्यानंतरचा अवकाळी पाऊस यामुळे शेवग्याच्या लागवडीवर मोठा परिणाम झाला. पुण्यासह राज्यातील विविध बाजारपेठेत मागणीच्या तुलनेत शेवग्याची आवक खूपच कमी होत आहे. किरकोळ बाजारात शेवगा प्रतिकिलो 500 ते 600 रूपये असून दहा ते पंधरा दिवस हे दर कायम राहण्याचा अंदाज व्यापारी वर्तवित आहेत. दर आवाक्याबाहेर गेल्याने शेवगा खरेदीकडे गृहिणींनी पाठ फिरवल्याचे चित्र बाजारात आहे.
राज्यासह परराज्यातून शेवग्याची आवक होते. नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधित गुजरातमधील शेग्याचा हंगाम, महाराष्ट्र नोव्हेंबर ते जून तर, तामिळनाडू मे ते नोव्हेंबर असा हंगाम असतो. मात्र, हवामान बदलामुळे शेवग्याच्या लागवडीत घट झाली आहे.