‘बिटकॉइन’ने गाठला उच्चांक

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर क्रिप्टो मार्केटमध्ये भलतीच तेजी आली आहे. सर्वात मोठी क्रिप्टो करन्सी असलेल्या बिटकॉइनच्या किमतीत सोमवारी लक्षणीय वाढ झाली. बिटकॉइनने 1,06,000 डॉलरचा उच्चांक गाठला. क्रिप्टो मार्केटमधील बिटकॉइनचा हिस्सा वाढून तो 56 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.

ट्रम्प यांनी निवडणूक जिंकताच बिटकॉइनने प्रथमच एक लाख डॉलरवर मजल मारली होती. अलीकडेच ट्रम्प यांनी अमेरिकेत ‘स्ट्रटेजिक ऑइल रिझर्व्ह’सह बिटकॉइनचा साठा तयार करण्याच्या योजनेबाबत माहिती दिली होती. यामुळे सर्वात लोकप्रिय क्रिप्टो करन्सीच्या किमतीत वाढ झाल्याचे दिसते. पुढील महिन्यात अर्थात नवीन वर्षाच्या सुरुवातीला अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वातील नवीन सरकार पदभार स्वीकारेल. ट्रम्प यांनी याआधीच क्रिप्टोच्या बाजूने धोरण तयार करण्याचे संकेत दिले आहेत. निवडणुकीच्या प्रचारातदेखील त्यांनी कडक नियम करण्याबाबत भाष्य केले होते.