‘रानटी’ चित्रपटाचा दमदार टिझर आला

‘द मोस्ट पावरफूल मराठी फिल्म ऑफ द डेकेड’ अशी दमदार टॅगलाईन मिरवणाऱ्या पुनीत बालन स्टुडिओज निर्मित, समित कक्कड दिग्दर्शित ‘रानटी’ या अॅक्शनपटाचा दमदार टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. आलेल्या परिस्थितीशी दोन हात करण्याची जिद्द असलेल्या विष्णूचा रौद्र अवतार दाखविणाऱ्या ‘रानटी’ चित्रपटाच्या टिझरमधून पाहायला मिळत आहे. ‘सुपर पॅकेज’ असलेला पॉवरफुल अॅक्शनपट ‘रानटी’ येत्या 22 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. अभिनेता शरद केळकर यांच्यासह अनेक कलाकारांचा जबरदस्त रानटी अंदाज यात पाहायला मिळतो. ‘रानटी’ हा मराठीतला सगळ्यात मोठा अॅक्शनपट आहे. सुप्रसिद्ध खलनायक जॅकी श्रॉफ आणि संजय दत्त यांनीसुद्धा ‘रानटी’चा टिझर सोशल मीडियावर शेअर केली आहे. दिग्दर्शक समित कक्कड यांचे सर्व चित्रपट लक्षवेधी आहेत. ‘रानटी’च्या निमित्ताने मराठीत भव्य अॅक्शनपट घेऊन आले आहेत. हृषिकेश कोळी यांचं लिखाण, अजित परब यांचं संगीत, अमर मोहिले यांचं पार्श्वसंगीत, एझाज गुलाब यांची साहसदृष्ये, सेतु श्रीराम यांचं छायाचित्रण, आशिष म्हात्रे यांचं संकलन लाभले.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sharad Kelkar (@sharadkelkar)