लोक महानगरसोडून उपनगरांकडे चालल्याचे चित्र दिसत आहे. विशेष म्हणजे हे सर्व वेगाने बदलतेय. 2011 पासून 2023 दरम्यान म्हणजेच गेल्या 12 वर्षात अशा लोकांचे प्रमाण सुमारे 12 टक्क्यांनी घटले. 75 टक्क्यांहून जास्त स्थलांतर आपल्या मूळ गावापासून 500 किलोमीटरच्या परिघापुरतेच मर्यादित झाले आहे. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने 2011 ते 2023-24 दरम्यान अनारक्षित रेल्वे तिकीट, उपग्रहाद्वारे रात्रीची छायाचित्रे, मोबाईल रोमिंग नोंदणी, राज्यांतील गैरकृषी जमिनीचा वापर, बँकांतील जमा रकमेच्या आधारे स्थलांतर इत्यादी गोष्टींचे सर्वेक्षण करून एक अहवाल तयार केला.
बिहारमधून महाराष्ट्रात येणाऱ्यांची संख्या वाढली
मुंबई, बंगळुरू शहर, हावडा, सेंट्रल दिल्ली, हैदराबाद या 5 जिह्यांत सर्वाधिक स्थलांतरित येत असल्याचे दिसत आहे. बिहारमधून महाराष्ट्रात येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. उत्तर प्रदेशातून दिल्ली, गुजरातमधून महाराष्ट्र, तेलंगणातून आंध्र, बिहारमधून दिल्लीत सर्वाधिक स्थलांतरीत होत असल्याचे समोर आले आहे.
महानगरांच्या शेजारी स्थलांतर वाढले
- ठाण्याहून मुंबईला येणारे प्रवासी 2012 मध्ये 21 टक्के होते. 2023 मध्ये ते 25 टक्के झाले. जमीन वापर वर्गीकरणाच्या आकडेवारीनुसार गैरकृषी जमिनीच्या वापराचे क्षेत्र 31 टक्क्यांनी वाढले.
- गाझियाबादमध्ये गैरकृषी जमिनीचा वापर 12 वर्षांत 18.73 टक्के वाढला. उत्तर प्रदेशात सरासरी वाढ 5.8 टक्के आहे.
- उत्तर परगणा आणि दक्षिण परगणा जिह्यांतून कोलकाताला जाणाऱया स्थलांतरितांच्या संख्येत वाढ झाली आहे. इतर ह्यांतून मात्र त्यात घट झाली असून 2021 मध्ये उत्तर परगणा जिह्यात केवळ 8.4 टक्के भाग गैरकृषीच्या स्वरूपात वापरला जात होता.