धोका वाढला… मुंबईत डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो रुग्णसंख्या दुपटीने वाढली

मुंबईत गेल्या काही दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे साथीच्या आजारांनी चांगलेच ठाण मांडले असून रुग्णांची संख्या दुपटीने वाढली आहे. गेल्या दोन आठवडय़ांत डेंग्यूचे 370, मलेरियाचे 509 तर गॅस्ट्रोचे तब्बल 545 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मुंबईत साथीच्या आजारांचा धोका वाढल्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मुंबईमध्ये जुलैच्या सुरुवातीपासूनच जोरदार पाऊस सुरू झाला आहे. पावसाचे पाणी साचून राहत असल्याने दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो, टायफॉइड, कॉलरा, कावीळ असे आजार तर कीटकांच्या प्रभावामुळे मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया असे आजार पसरतात. त्यामुळे मुंबईत जुलैच्या पहिल्या आठवडय़ापासूनच पावसाने जोरदार बरसायला सुरुवात केल्याने साथीचे आजारही पसरायला सुरुवात झाली आहे. जुलैमध्ये पहिल्या दोन आठवडय़ांत डेंग्यूचे 166, मलेरियाचे 282 तर स्वाइन फ्लूचे 53 रुग्ण, लेप्टोचे 52, गॅस्ट्रोचे 694, कावीळचे 75 तर चिकुनगुनियाचा एक रुग्ण आढळला होता. साथीच्या आजारांची वाढ कायम असून रुग्णांच्या संख्येत सुमारे दुप्पट वाढ झाली असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून दिलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे.

पावसाळी आजार रोखण्यासाठी पालिका सज्ज

पालिकेकडून लघुपटाच्या माध्यमातून जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. ‘भाग मच्छर भाग’ ही विशेष जनजागृती मोहीम राबवली जात आहे. यामध्ये डास प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे आवाहन करणारा संदेश सेलिब्रिटींकडून क्हिडीओच्या माध्यमातून दिला जात असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

रुग्णांसाठी प्रमुख आणि उपनगरीय रुग्णालयात तीन हजार बेड तैनात ठेवण्यात आले आहेत. यामध्ये उपनगरीय रुग्णालयात विशेष 500 बेडही तैनात आहेत. संध्याकाळी 4 ते 6 ओपीडी सुरू ठेवण्यात येत आहेत. शिवाय कीटकनाशक विभागाकडूनही धूम्र फवारणी मोहीम क्यापकपणे राबवण्यात येत आहे.

अशी घ्या काळजी

पावसाळी आजार टाळण्यासाठी नागरिकांनी घर-परिसर स्कच्छ ठेवावा, पाणी साचू देऊ नये, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नये, गरज असल्यास पालिकेच्या दवाखान्यात संपर्क करावा, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. तसेच रस्त्यावरील उघडे अन्न खाणे टाळावे, पाणी उकळून प्यावे, हात धुवाकेत, तर स्वाइन फ्लूपासून बचावासाठी गर्दीत जाऊ नये, शिंकताना-खोकताना नाक-तोंडावर रुमाल धरावा, मास्क वापरावा.

जुलै महिन्यातील रुग्णसंख्या

   मलेरिया         797

   लेप्टो              141

   डेंग्यू               535

   गॅस्ट्रो             141

   कावीळ           146

   स्वाईन फ्लू     161

   चिकुनगुनिया     25