
उन्हाळ्याच्या काळात घरांमध्ये झुरळ आणि पाली हमखास दिसायला लागतात. उन्हाळ्यात सर्वात जास्त झुरळांची संख्या घरामध्ये वाढू लागते. झुरळ स्वयंपाकघर, बाथरूम, कपाट अशा ठिकाणी वेगाने पसरतात आणि साफसफाई करूनही ते जात नाहीत. तुम्ही वारंवार कीटकनाशक फवारुन वैतागले असाल तर आता फक्त हा 5 रुपयांचा उपाय करुन बघा.. झुरळे पळतील कायमची दूर.
पहिला आणि सर्वात प्रभावी उपाय म्हणजे बोरिक पावडर वापरणे. मेडिकल स्टोअरमध्ये छोटी बोरिक पावडरची पुडी ही अंदाजे 10 रुपयांना मिळते. या पावडरची खासियत अशी आहे की, ती झुरळाच्या शरीरात प्रवेश करते आणि आतून त्याला मारते.
कसे वापरायचे?
बोरिक पावडर एका कागदावर ठेवून ती ओट्याखाली किंवा बेसिनखाली ठेवून द्यावी.
घराच्या ज्या ठिकाणी झुरळे वारंवार दिसतात, जसे की सिंकखाली, रेफ्रिजरेटरच्या मागे, बाथरूमचे कोपरे आणि कपाटांच्या आत अशा ठिकाणी बोरिक पावडर ठेवावी.
बोरिक पावडरपासून मुलांना आणि पाळीव प्राण्यांना दूर ठेवा.परिणाम टिकवून ठेवण्यासाठी दर 2-3 दिवसांनी पावडर पुन्हा टाकत राहा.
बोरिक पावडर प्रभावी का आहे?
झुरळ बोरिक पावडरजवळ येतो तेव्हा ते त्याच्या पायांना आणि शरीराला चिकटते. काही तासांतच त्याचा मृत्यू होतो. एवढेच नाही तर जेव्हा झुरळ मरतो तेव्हा इतर झुरळे ते खातात आणि विष त्यांच्या शरीरातही जाते. अशाप्रकारे संपूर्ण झुरळं नष्ट होतात.
बोरिक पावडर गव्हाचे पीठ आणि थोडी साखर मिसळून त्याचे लहान गोळे बनवून घराच्या कोपऱ्यात ठेवता येते. याशिवाय, घराच्या कोपऱ्यात, विशेषतः स्वयंपाकघरात आणि साठवणुकीच्या ठिकाणी वाळलेली तमालपत्रे ठेवा, कारण झुरळांना त्याचा वास आवडत नाही. हे सर्व उपाय फक्त 10 ते 15 रुपयांमध्ये सहज करता येतात आणि कोणत्याही प्रयत्नाशिवाय तुमचे घर झुरळमुक्त होईल.