वानखेडे स्टेडियमवर आता शरद पवार स्टँड, MCA चा मोठा निर्णय

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी पार पडली. या सभेत वानखेडे स्टेडियमवरील एका स्टँडला राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष, BCCI व ICC चे माजी अध्यक्ष शरद पवार यांचे नाव एका स्टँडला देण्याचा निर्णय घेण्यात आला. शरद पवार यांच्यासोबतच टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, टीम इंडियाचे माजी फलंदाज अजित वाडेकर यांचे नाव देखील स्टँड्सना देण्यात आले आहे.