गुजरातमधील शेवग्याचा हंगाम सुरू झाला आहे. आवक वाढल्याने दरात घट झाली आहे. तीन आठवडय़ांपूर्वी 600 रुपये किलो असे दर मिळाले होते. आता किरकोळ बाजारात एक किलो शेवग्याचे दर 200 ते 240 रुपयांपर्यंत खाली आले आहेत. शेवग्याच्या दरात घट झाल्याने गृहिणींना दिलासा मिळाला आहे.
गुजरातमधील शेवग्याचा हंगाम सुरू झाला आहे. मार्पेटयार्डातील घाऊक बाजारात गुजरातमधून दररोज 100 ते 125 डाग (एक डाग 30 ते 35 किलो) शेवग्याची आवक होत आहे. गुजरातमधील शेवग्याची आवक वाढल्याने दरात घट झाली आहे. घाऊक बाजारात सध्या दहा किलो शेवग्यास 1200 ते 1600 रुपये भाव मिळत आहे. तीन आठवड्यांपूर्वी घाऊक बाजारात दहा किलो शेवग्याला 3500 ते 4000 रुपये दर मिळाले होते. गुजरातमधील शेवग्याचा हंगाम नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत सुरू असतो. त्यानंतर सोलापूर, नाशिक भागातील शेवग्याचा हंगाम सुरू होतो.