हिंदुस्थानी लष्कराला मिळणार तोफेची ‘वज्र’मूठ; दुश्मनाला पळता भुई थोडी होणार!

हिंदुस्थानी लष्कराला आता 155 मिमी आणि 152 कॅलिबरचे ‘के 9 वज्र टी’ स्वयंचलित तोफा मिळणार आहेत. हे सर्व खरेदी करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने लार्सन अँड टुब्रोसोबत नुकताच 7 हजार 628 कोटी रुपयांचा एक करार केला आहे. संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांच्या उपस्थितीत मंत्रालयाचे अधिकारी आणि एल अँड टीचे प्रतिनिधींदरम्यान या करारावर स्वाक्षऱया करण्यात आल्या. ‘के 9 वज्र टी’च्या खरेदीनंतर हिंदुस्थानी लष्कराचा तोफखाना आणि अत्याधुनिकीकरणाला प्रोत्साहन मिळणार आहे. के 9 वज्र टीच्या खरेदीमुळे हिंदुस्थानच्या दुश्मनाचे धाबे दणाणले असून आगामी काळात त्यांना पळता भुई थोडी होणार आहे. शत्रूंच्या ठिकाणांचा अचूक वेध घेत त्यांना नष्ट करण्याचे काम के 9 वज्र टी करणार आहे. हे लांब अंतरावर मारा करण्यात सक्षम आहे. तसेच उंच परिसरात असलेल्या आणि मायनस डिग्री तापमानातसुद्धा पूर्ण क्षमतेने फायरिंग करण्यात सक्षम आहे.

के 9 वज्र टीची खास वैशिष्टय़े

155 मिमी/52 कॅलिबर तोफ ः ही तोफ 155 मिमी कॅलिबर आणि 52 कॅलिबर लांबीची आहे. याने मध्यम आणि लांबच्या अंतरावरील लक्ष्याला टार्गेट करणे सोपे आहे.

स्वयंचलित कंट्रोल सिस्टमः ही तोफ स्वयंचलित प्लॅटफॉर्मवर असून वेगाने घेऊन जाण्यात आणि तैनात करण्यात सक्षम आहे.

फायर कंट्रोल सिस्टमः ही तोफ एक जबरदस्त फायर कंट्रोल सिस्टमसोबत येते, जी अचूक मारा करण्यात सक्षम आहे.

नाईट व्हिजन क्षमता : ही तोफ नाईट व्हिजन क्षमतेसोबत येते. म्हणजेच रात्रीच्या वेळी अचूक मारा करण्यात सक्षम आहे.