मुंबईत शुक्रवारपासून पावसाची संततधार सुरू असून हवामानखात्याने शनिवारी मुंबईला ऑरेंज अलर्ट दिला आहे. सकाळपासून मुंबईत अनेक भागात मुसळधार व अति मुसळधार पाऊस पडत आहेत. दरम्यान संततधार पावसामुळे अंधेरी सबवेमध्ये पाणी भरले असून हा सबवे बंद करण्यात आला आहे.
The India Meteorological Department has issued an orange alert (heavy to very heavy rainfall) for Mumbai today.
Today’s high tide is at 4.39 pm & of 3.69 meter.
Mumbaikars are requested to avoid stepping out, if not essential.
For any assistance, please dial 1916#MyBMCUpdate…
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 13, 2024
दरम्यान मुंबईतील समुद्रात दुपारी साडेचारच्या सुमारास भरती येणार असून अति मोठ्या लाटा उसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेने मुंबईकरांना समुद्रकिनारी न जाण्याचा इशारा दिला आहे. तसेच अति मुसळधार पावसाचा इशारा असल्याने मुंबईकरांनी गरज असेल तरच घराबाहेर पडा असे आवाहन पालिकेने केले आहे.
पाणी साचल्याने अंधेरी सबवे वाहतूकीसाठी तात्पुरता बंद ठेवण्यात आला आहे. दरम्यान वाहतूकीचा मार्ग अंधेरी सबवे पूर्व गोखले रोडकडे व अंधेरी सबवे पश्चिम एस.व्हि रोड मार्गे गोखले रोडकडे वळविण्यात आला आहे. प्रवाशांनी याची नोंद घ्यावी.#MTPTrafficUpdate
— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) July 13, 2024