शहरातील 1993 च्या जातीय दंगलीदरम्यान अंधेरीत तिघांची हत्या केल्याचा आरोप असलेल्या किसन सोमा साठे याला उच्च न्यायालयाने गुरुवारी दोषमुक्त केले. पाच जणांच्या कबुलीजबाबांना समर्थन देण्यासाठी सरकारी पक्ष ठोस पुरावे सादर करण्यात अपयशी ठरला आहे, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने साठेला दोषमुक्त केले. पोलिसांनी आरोपीविरुद्ध हत्येचा गंभीर आरोप केला. मात्र हा आरोप केवळ कबुलीजबाबाच्या आधारे कायदेशीररीत्या मान्य करू शकत नाही, असे निरीक्षण न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांनी नोंदवले.