
आता हेल्थ इन्शुरन्स क्लेम कुठेही अडकणार नाही, डिस्चार्जचीही झंझट राहणार नाही, अगदी मोबाईलवर क्लेम स्टेटस तपासता येणार आहे. आरोग्य विम्याचे दावे त्वरित सेटल व्हावे आणि या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता यावी, यासाठी नॅशनल हेल्थ क्लेम एक्स्चेंज (एनएचसीएक्स) प्रोग्रॅमअंतर्गत मंत्रालयाने आरोग्य डिजिटल प्लॅटफॉर्म तयार केलाय. हेल्थ इन्शुरन्स सर्व्हिस देणाऱया कमीत कमी 33 पंपन्या नॅशनल हेल्थ क्लेम एक्स्चेंजशी जोडल्या गेल्या आहेत.
आरोग्य विम्या दाव्यांशी संबंधित माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी नॅशनल हेल्थ क्लेम एक्स्चेंज (एनएचसीएक्स) प्लॅटफॉर्म तयार करण्यात आलेय. आतापर्यंत हे काम वेगवेगळय़ा प्लॅटफॉर्ममार्फत व्हायचे, त्यामुळे वेळ लागायचा. एनएचसीएक्स प्लॅटफॉर्ममुळे विम्या दाव्यांशी संबधित प्रक्रिया जलदगतीने होईल तसेच या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता येईल. विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाला (आयआरडीएआय) आरोग्य विमा दाव्यांच्या सेटलमेंट्सच्या स्थितीची रिअल टाईम माहिती मिळेल.
नॅशनल हेल्थ इन्शुरन्स आणि आरआरडीआयए यांनी संयुक्तपणे हा प्लॅटफॉर्म तयार केलाय. नॅशनल हेल्थ इन्शुरन्सच्या वरिष्ठ अधिकाऱयाने दिलेल्या माहितीनुसार, सामान्य लोकही मोबाईलच्या माध्यमातून विम्याच्या दाव्याची परिस्थिती पाहू शकतील. त्यासाठी हे सेंट्रल प्लॅटफॉर्म विकसित करण्यात आलेय. काही पंपन्यांनी ट्रायल म्हणून एनएचसीएक्स प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून क्लेम सेटलमेंट प्रक्रिया सुरू केलीय.
डिस्चार्जचीही झंझट नाही
सध्या रुग्णालयात उपचारासाठी जाणाऱया रुग्णाला आपल्या विमा पॉलिसीचा तपशील किंवा थर्ड पार्टी अॅडमिनिस्ट्रेटर किंवा विमा पंपनीने दिलेले कार्ड दाखवून उपचार घ्यावे लागतात. क्लेम मंजुरी मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड केली जातात. कधी कधी या प्रक्रियेस वेळ लागतो. परिणामी रुग्णाला डिस्चार्ज मिळण्यास उशीर होतो किंवा रुग्णाच्या खिशातून जास्त पैसे खर्च होतात. ‘एनएचसीएक्स’मुळे ही समस्या सोडवता येईल.