कॉल ड्रॉपिंगची डोकेदुखी वाढली

जिओ, एअरटेल आणि वोडाफोन-आयडिया या कंपन्यांनी नुकताच ग्राहकांना झटका देत रिचार्ज 10 ते 25 टक्क्यांनी वाढवले. मात्र त्यांची खराब नेटवर्कची समस्या काही संपलेली नाही. ग्राहकांना कॉल कनेक्ट न होणे, कॉल ड्रॉपिंगसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. याला कंटाळून लोक आता वायफाय कॉलिंगला प्राधान्य देत आहेत. ‘लोकल सर्कल’ने नुकताच याबाबतचा सर्व्हे केला.

तीनपैकी एका व्यक्तीने वायफाय कॉलिंग करत असल्याचे सांगितले. सर्व्हेत सहभागी झालेल्या एक तृतीयांश लोकांनी व्हॉट्सऍप, फेसटाईम किंवा स्काईप यांसारख्या ओटीटी ऍप्सचा वापर करून वायफाय कॉल करावा लागत असल्याचे सांगितले. घरात आणि ऑफिसमध्ये ही समस्या येत आहे. गेल्या दोन वर्षांत वायफाय कॉलिंग करणाऱयांची संख्या वाढलीय.