बॉलिवुडचे शोमन राज कपूर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘राज कपूर 100 – सेलिब्रेटिंग द सेनटेनरी ऑफ द ग्रेटेस्ट शोमन’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आरके फिल्म्स, फिल्म हेरिटेज फाऊंडेशन, एनएफडीसी, एनएफएआय आणि सिनेमास यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा शुक्रवारी पार पडला. उद्घाटन सोहळ्याला रणबीर कपूर, आलिया भट्ट, करीना कपूर, सैफ अली खान आणि करिश्मा कपूर, प्रेम चोप्रा असे अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते. 15 डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवाअंतर्गत 40 शहरे आणि 135 चित्रपटगृहांमध्ये राज कपूर यांचे 10 गाजलेले चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत. पीव्हीआर, आयनॉक्स आणि सिनेपोलीस सिनेमागृहांमध्ये हे स्क्रिनिंग होणार आहे.