अर्थवृत्त – मध्यमवर्गीयांची काटकसर वाढली!

शहरातील नागरिक महागाईने त्रस्त

केंद्रात मोदी सरकार आल्यापासून महागाईचा आलेख वाढतच आहे. महागाईपासून होरपळणाऱ्या तमाम नागरिकांना दिलासा देण्यात केंद्रातील मोदी सरकारला सपशेल अपयश आले आहे. महागाईचा परिणाम आता ऐन सणासुदीत ठळकपणे दिसू लागला आहे. शहरात राहणाऱया मध्यमवर्गीयांनी खर्च करताना काटकसर सुरू केली आहे. हातात खेळता पैसा नसल्याने मध्यमवर्गीयांना हे करावे लागत आहे. एका आठवड्यात दोन एफएमसीजी कंपन्यांच्या माहितीनुसार, मध्यमवर्गीयांनी ऐन सणासुदीत खर्च करण्यात हात आखडता घेतला आहे. त्यामुळे शहरातील वस्तू खरेदी करण्याची डिमांड कमी झाली आहे. हिंदुस्थान युनिलीवर लिमिटेड आणि नेस्ले इंडियाने यासंबंधी माहिती दिली आहे. डिमांड कमी झाल्याच्या वृत्ताला या कंपन्यांच्या मॅनेजमेंटनेही दुजोरा दिला आहे. हिंदुस्थान युनिलीवर लिमिटेडचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक रोहित जावा यांच्या माहितीनुसार, सप्टेंबर तिमाहीत शहरी मार्पेटमध्ये एफएमसीजी डिमांडमध्ये घसरण पाहायला मिळत आहे.

पॅराडाइम रियल्टी
पॅराडाइम रियल्टीने तीन प्रकल्पांसाठी आकर्षक ऑफर सादर केली. चेंबूरमधील सिंधी सोसायटीमधील पॅराडाइम 71 मिडटाऊन, बोरिवली (पश्चिम) पॅराडाइम अनंतारा, सांताक्रुझ (पश्चिम) पॅराडाइम आर्टेझा या तीन प्रकल्पांवर ऑफर आहे.

कॅनन इंडिया
कॅनन इंडिया कंपनीने ब्रॉडकास्ट इंडिया शो 2024 च्या 33 व्या आवृत्तीत आकर्षक बूथचे अनावरण केले. हा शो जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे 17 ते 19 ऑक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात आला होता.

लाईफ इन्शुरन्स
लाईफ इन्शुरन्स कान्सिलने सप्टेंबर 2024 महिन्यासाठी अपडेटेड उद्योग-व्यवसाय आकडेवारी जारी केली आहे. आयुर्विमा कंपन्यांनी अंडरराइट केलेल्या न्यू बिझनेस प्रीमियम्सनी (एनबीपी) सप्टेंबर 24 मध्ये वार्षिक 14.01 टक्क्यांची वाढ केली आहे.

एडलवाइज लाइफ
एडलवाइज लाइफ इन्श्युरन्सने जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी पॅपिटल स्मॉल फायनान्स बँक आणि ईएसएएफ बँकेसोबत भागीदारी केली. या कार्यक्रमावेळी एडलवाइज लाइफचे चीफ डिस्ट्रिब्युशन ऑफिसर अनुप सेठ उपस्थित होते.

खर्चाची धाकधूक
जुलै ते सप्टेंबर तिमाहीमध्ये डिमांडची कमी आली आहे. या तिमाहीत नेस्ले इंडियाची ग्रोथ गेल्या आठ वर्षांत सर्वात कमी राहिली आहे. शहरात राहणाऱया मध्यमवर्गीयांनी आपल्या खर्चात कपात केली आहे. ज्या लोकांकडे पैसा आहे ते खर्च करण्यात मागेपुढे पाहत नाहीत. परंतु शहरातील मध्यमवर्गीय लोक खर्च करताना हात आखडता घेत आहेत, ते खर्च करण्यात मागेपुढे पाहत आहेत.

शेअर बाजारात पडझड सुरूच
ऐन सणासुदीच्या तोंडावर शेअर बाजारात पडझड पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये सलग पाचव्या दिवशी घसरण झाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स शुक्रवारी 662 अंकांनी घसरून 79,402 अंकावर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 218 अंकांनी घसरून 24,180 अंकावर बंद झाला. गेल्या काही दिवसांनंतर सेन्सेक्स 80 हजारांच्या खाली तर निफ्टी 25 हजारांच्या खाली आला आहे. आज बँकिंग, ऑटो इंडेक्समध्ये चांगलीच घसरण झाली.

महाराजा कंपनीची नवी अगरबत्ती
महाराजा अगरबत्ती पंपनीने प्युअर हिना आणि गोल्डन पेटल्स प्युअर ब्रँडची अगरबत्ती बाजारात आणली आहे. या अगरबत्तीला नैसर्गिक सुगंध आहे. या अगरबत्तीच्या मनमोहक सुगंधाने देवाची प्रार्थना करताना मन अगदी प्रसन्न राहते. ही अगरबत्ती 50 ग्रॅम, 100 ग्रॅम आणि 250 ग्रॅमच्या पॅकिंगमध्ये उपलब्ध आहे. महाराजा पंपनीची अगरबत्ती खरेदी करताना पंपनीचा लोगो पाहून खरेदी करावे असे पंपनीने म्हटले आहे. महाराजा पंपनीची अगरबत्ती प्रत्येक अगरबत्तीच्या दुकानात तसेच महाराजा अगरबत्ती, रघुनाथ निवास, डी. व्ही. देशपांडे मार्ग, शिवाजी पार्क, रोड क्र. 4, दादर, मुंबई-28 येथे उपलब्ध आहेत. संपर्क – 8369185071.

करिष्माची नवी अगरबत्ती बाजारात
बंगळुरू येथील करिष्मा प्रोडक्ट्सची नवी अगरबत्ती करिष्मा अंगारे ऊद आणि हिमालय कस्तुरी नॅचरल बेस अगरबत्ती बाजारात दाखल झाली आहे. ही अगरबत्ती नैसर्गिक वनस्पतीपासून तयार केल्या आहेत. या अगरबत्तीला नैसर्गिक सुगंध आहे. ही अगरबत्ती 50 ग्रॅम, 100 ग्रॅम आणि 250 ग्रॅमच्या पॅकिंगमध्ये उपलब्ध आहे. बंगळुरू पंपनीचा लोगो पाहूनच अगरबत्ती खरेदी करावी. संपर्क – 9343834805.

उज्जीवन स्मॉल फायनान्सची कामगिरी
उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक लि. ने नुकत्याच समाप्त झालेल्या तिमाहीसाठी आर्थिक कामगिरीची घोषणा केली. निव्वळ लोन बुक वार्षिक 14 टक्क्यांच्या वाढीसह 30,344 कोटी रुपयांवर पोहोचले. सुरक्षित खाते पुस्तक जून 2024 मधील 31.3 टक्क्यांच्या तुलनेत सप्टेंबर 2024 मध्ये 34.9 टक्के वाढ झाली. या वेळी संजीव नौटियाल उपस्थित होते.

कॅप्री ग्लोबल पॅपिटलचे नवे उत्पादन
पॅप्री ग्लोबल पॅपिटल लिमिटेड (पॅप्री लोन्स) या आघाडीच्या नॉन-बँकिंग वित्तीय पंपनीने एमएसएमई लोन्स विभागातील आपले रूफटॉप सोलार फायनान्स उत्पादन बाजारात आणले आहे. पॅप्री सोलार फायनान्स कोणत्याही तारणाशिवाय तसेच कमीतकमी कागदपत्रांवर विनासायास कर्ज उत्पादने देत आहेत.