![shower](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/shower-696x447.jpg)
एका डॉक्टरने पाच वर्षे आंघोळच केली नाही. डॉ. जेम्स हॅम्बलिन असे त्यांचे नाव आहे. वास्तविक आपल्या त्वचेला स्वच्छतेची किती गरज आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांनी ही अजब कृती केली. ‘क्लीनः द न्यू सायन्स ऑफ स्किन’ या पुस्तकात त्यांनी याबाबतचा अनुभव सांगितला.
डॉ. जेम्स हॅम्बलिन हे प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन आणि पब्लिक हेल्थ तज्ञ आहेत. त्यांनी रोज आंघोळ करण्याची खरी गरज समजून घेण्याच्या प्रयत्नात पाच वर्षे आंघोळ करणे बंद केले. त्यामुळे शरीराच्या दुर्गंधीचे काय? असा मुख्य सवाल त्यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, नियमितपणे साबणाने हात धुवा, गरज पडल्यास केस ओले करा, शरीरावर घाण दिसली तर पाण्याने साफ करा. गरम पाण्याने आंघोळ करणे वाईट. साबण, तेल, रसायने वापरणे वाईट आहे, ज्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात, असे ते म्हणाले.