
उन्हाळा आणि लिंबू यांचे एक अनोखे नातं आहे. उन्हाळ्यात घरी कुणीही पाहुणे आल्यावर, लिंबाचा सरबत देण्याची प्रथा आपल्याकडे फार पूर्वीपासून आहे. त्यामुळेच उन्हाळ्यात लिंबू पाणी पिणे हे कायम गरजेचे मानले गेले आहे. उन्हाळ्यात शरीर हायड्रेटेड राहण्यासाठी लिंबू पाण्याचे सेवन खूप फायदेशीर मानले जाते. लिंबू पाण्याचा केवळ आपल्या शरीराला नाही तर, त्वचेला सुद्धा फायदा होतो.
बहुतांशी लोक तंदुरुस्त राहण्यासाठी रोज सकाळी लिंबू पाणी पितात. मात्र या काळात अनेक वेळा आपण अशी चूक करतो ज्यामुळे लिंबू पाण्याचे फायदे हानीकारक होऊ शकतात.
अनेकदा लोक लिंबूपाणी बनवताना त्यामध्ये साखर घालतात, मात्र लिंबू पाण्यात साखर घालणे बऱ्याच अंशी हितावह नसते. लिंबू पाण्यात साखर टाकल्याने केवळ कॅलरीजचे प्रमाण वाढत नाही तर, साखर तुमच्या शरीरातील हायड्रेशन देखील काढून टाकते. यामुळे, तुम्हाला दिवसभर थकवा आणि अशक्तपणा जाणवू शकतो.
लिंबू पाणी पिण्याची योग्य पद्धत कोणती?
लिंबूपाणी बनवताना लिंबू पाण्यात साखर घालू नका.
लिंबू पाण्यात सेंधा मीठ घालावे यामुळे आपल्या शरीरातील सोडियमचे संतुलन राखले जाते.
नारळ पाणी शरीराला नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट प्रदान करण्याचे काम करते. म्हणून लिंबू पाणी बनवताना त्यामध्ये नारळ पाणी घाला. यामुळे तुम्हाला दिवसभर हायड्रेटेड वाटेल.
(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)