
शिक्षण क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्यासाठी ‘द सर्कल इंडिया’ या संस्थेने मुंबईत वेगवेगळ्या शहरांमध्ये आयोजित केलेल्या ‘रिइन्व्हेंटिंग द रिपब्लिक’ या प्रदर्शनाची यशस्वी सांगता झाली.
‘द सर्कल इंडिया’ने शिक्षण क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्यासाठी उद्यमींचे योगदान वाढावे यासाठी हा उपक्रम राबवला होता. या संस्थेने आतापर्यंत 5,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांसाठी 18 कार्यक्रम सुरू केले आहेत आणि देशभरात 8,500 शिक्षकांना स्वतःसोबत जोडले आहे. 2028 पर्यंत 25,000 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे हे संस्थेचे उद्दिष्ट आहे, असे संस्थापक संदीप राय यांनी सांगितले.