सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शनच्या प्रश्नावर केंद्रानं दिलं उत्तर, कर्मचाऱ्यांची घोर निराशा

loksabha

सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी लोकसभा सभागृहात जुन्या पेन्शन संदर्भात प्रश्न विचारला होता. निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. यासाठी ठिकठिकाणी आंदोलनं देखील सुरू आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शनसाठी मोठं आंदोलनही उभारलं होतं. तेव्हा सरकारी कर्मचाऱ्यांचं समाधान करण्यासाठी राज्य सरकार याबाबत काम करत असून निश्चित मार्ग काढू असं आश्वासन दिलं होतं. मात्र अद्यापही राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनचा लाभ मिळत नाही. अशीच मागणी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचीही तीच मागणी आहे. यासंदर्भातच प्रणिती शिंदे यांनी जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याच्या संदर्भात संसदेत प्रश्न विचारला. पण, या प्रश्नाला उत्तर देताना केंद्र सरकारने आपली भूमिका अगदी स्पष्ट केली आहे. जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारने स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. यामुळे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांची घोर निराशा झाली आहे.

जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात सरकारचा कोणताही विचार नाही, असं केंद्र सरकारनं खासदार प्रणिती शिंदे यांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना अगदी स्पष्ट केलं आहे. जुनी पेन्शन लागू करण्यासाठी सरकारी कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून आग्रह करत आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांपैकी ती प्रमुख मागणी आहे. मात्र आता केंद्राच्या उत्तरानं कर्मचारांची निराशा झाली आहे. जुनी पेन्शन योजना लागू करा अशी मागणी सातत्यानं केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांकडून केली जात होती.