रेस्टॉरेंटमध्ये जेवण करणे एका यूटय़ूबरला चांगलेच महागात पडले. अंधेरी येथील एका रेस्टॉरेंटमध्ये गेल्यानंतर जेवण करण्यासाठी दाल आणि पनीरची भाजी ऑर्डर केली होती. परंतु जेव्हा हॉटेल कर्मचाऱयाने हातात दहा हजार रुपयांचे बिल सोपवले, त्या वेळी यूटय़ूबरला एसी हॉटेलात दरदरून घाम फुटला.
जेवणासाठी फक्त दाल आणि पनीरचे बिल दहा हजार रुपये आल्यानंतर या यूटय़ूबरने यासंबंधीची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. रेस्टॉरेंटच्या नो-सर्व्हिस चार्ज पॉलिसीवर भाष्य केले आहे. यूटय़ूबरने ऑर्डर केलेल्या जेवणात पनीर खुरचन, दाल भुखरा, पनीर मखनीसोबत रोटी आणि पुदीना पराठय़ाचा समावेश होता. परंतु या सर्व पदार्थांची किंमत दहा हजार रुपये जरा जास्त आहे, असे यूटय़ूबरने म्हटले आहे.