ठाणेकरांचा नारा ‘आम्ही सारे राजन विचारे’, शिवसेनेची प्रचार यात्रा घरोघरी पोहोचली

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाविकास आघाडीचे ठाणे शहर विधानसभेचे उमेदवार राजन विचारे यांच्या महाविजयाची प्रचार यात्रा आज घरोघरी पोहोचली. शिवसेनेचे निष्ठावंत उमेदवार राजन विचारे यांच्या स्वागतासाठी चौकाचौकात जोरदार मोठी गर्दी झाली होती. सर्वांचा एकच नारा होता ‘आम्ही सारे राजन विचारे’.. शिवसेना झिंदाबाद..उद्धव ठाकरे आगे बढो.. कोण आला रे, कोण आला.. ओरिजनल शिवसेनेचा वाघ आला, अशा घोषणांनी प्रचार यात्रा दणाणून गेली.

ठाणे शहर हे शिवसेना आणि महाविकास आघाडीचा गड असून गेल्या अनेक वर्षांत या मतदारसंघाचे नेतृत्व शिवसेनेने केले आहे. ठाण्याचे दिवंगत जिल्हाप्रमुख धर्मवीर आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली या भागात शिवसेनेचे खासदार, आमदार निवडून आले होते. मात्र गेल्या अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेशी गद्दारी करून भाजपच्या बुडाखाली गेलेल्या मिंधे गटाने शिवसैनिकांमध्ये फूट पाडल्याचा संताप ठाणेकर व्यक्त करत आहेत.

राजन विचारे यांच्या प्रचार यात्रेला 6 वाजता चरई शिवसेना शाखेपासून सुरुवात झाली. त्यानंतर साईबाबा मंदिर, तीन पेट्रोल पंप, एलबीएस मार्ग, लोकमान्य सोसायटी, दगडी शाळा, चिंतामण चौक, अहिल्यादेवी गार्डन, जोशी वाडा, काबाड आळी, टेंभी नाका, आंबेडकर रोड, मनोहर पाडा, धोबीआळी, गणेश टॉकीज, गीता सोसायटी येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने शिवसेना आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आणि युवासैनिक उपस्थित होते.