गुन्हेगार मोकाट, विरोधकांवर ‘वॉच’, पत्रकार परिषद सुरू असताना पोलीस जितेंद्र आव्हाड यांच्या घरात घुसले

बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येमुळे महाराष्ट्र हादरला. या हत्याकांडाला 25 दिवस उलटून गेले असले तरी अद्याप तीन मुख्य आरोपी मोकाट आहेत. त्यांना अटक करून कायद्याचा धाक दाखवायचे सोडून पोलीस विरोधकांवर वॉच ठेवत आहेत. संतोष देशमुख हत्याकांडावरून सरकारला धारेवर धरणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पत्रकार परिषदेत पोलीस घुसल्याचे समोर आले आहे.

जितेंद्र आव्हाड आपल्या घरामध्ये पत्रकार परिषद घेत होते. याच दरम्यान ठाण्याच्या एसबी (विशेष शाखा) चे पोलीस आव्हाड यांच्या घरामध्ये घुसले आणि शुटिंग करू लागले. यामुळे आव्हाड यांनी संताप व्यक्त केला असून विरोधी पक्षाच्या नेत्यांवर पोलीस का वॉच ठेवत आहेत? असा सवालस उपस्थित केला आहे.

“हे प्रकरण आता इतकं किचकट आणि किळसवाणं..”, वाल्मीक कराडवरून आव्हाडांच्या मध्यरात्री 2 खळबळजनक पोस्ट

पोलिसांनी आमच्यावर वॉच ठेवण्यापेक्षा वाल्मीक कराडवर वॉच ठेवावा. माझ्या खासगी घरात पत्रकार परिषद सुरू असताना पोलीस घुसतात कसे? सरकारला नक्की वॉच ठेवून काय करायचे आहे? अशा सवालांच्या फैरी आव्हाड यांनी झाडल्या.