![malang-gad](https://www.saamana.com/wp-content/uploads/2018/01/malang-gad-696x447.jpg)
माघी पौर्णिमेला उद्या बुधवारी कल्याणजवळील मलंगगड दुमदुमून जाणार आहे. मात्र उत्सवाच्या पूर्वसंध्येलाच पोलिसांनी हिंदू भक्तांना नोटिसा धाडल्या आहेत. उत्सव शिस्तीत आणि सभ्यपणे पार पाडण्याचे स्पष्टपणे बजावले आहे. या नोटिसांमुळे हिंदू भाविकांमध्ये संतापाची लाट पसरली असून वा रे हिंदुत्ववादी सरकार… म्हणत केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी भाजप सरकारच्या बेगडी आणि पोकळ हिंदुत्वाच्या पुळक्याबद्दल सडकून टीका केली जात आहे
हिललाइन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांनी काही हिंदू कार्यकर्त्यांना मनाई आदेशाच्या नोटिसा काढल्या आहेत. उत्सवादरम्यान सभ्यता अथवा नीतिमत्ता यास धोका पोहोचल्यास दखलपात्र गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः गृहमंत्री असताना हिंदू कार्यकर्त्यांना नीतिमत्तेचे धडे देणाऱ्या नोटिसा आल्याने संताप व्यक्त होत आहे.