
भिवंडीत परफ्युमच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना बुधवारी घडली. आगीत तीन परफ्युम कंपनीची गोदामे जळून खाक झाली आहेत. भिवंडीत आठ तासांहून अधिक काळ अग्नीतांडव सुरू आहे. अग्नीशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
भिवंडीतील मुंबई-नाशिक महामार्गालगत असलेल्या येवई गावात आर.के.लॉजिस्टिक गोदाम संकुलात बुधवारी पहाटेच्या सुमारास आग लागली. बॅकरोझ परफ्युम अँड ब्युटी प्रोडक्ट्स, इंटरक्राफ्ट ट्रेडिंग आणि फ्रेगरन्स शॉप या कंपन्यांच्या गोदामांना आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले.
आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी गोदामे जळून खाक झाली आहेत. शर्थीचे प्रयत्न करूनही आग आटोक्यात आणण्यास अद्याप यश आले नाही. परिसरात 10 ते 15 किमी अंतरावर धुराचे लोट दिसत आहेत. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.
भिवंडीतील मुंबई-नाशिक महामार्गालगत असलेल्या येवई गावात आर.के.लॉजिस्टिक गोदाम संकुलात बुधवारी पहाटेच्या सुमारास आग लागली. बॅकरोझ परफ्युम अँड ब्युटी प्रोडक्ट्स, इंटरक्राफ्ट ट्रेडिंग आणि फ्रेगरन्स शॉप या कंपन्यांच्या गोदामांना आग लागली. pic.twitter.com/MlAwqfT2up
— Saamana Online (@SaamanaOnline) February 19, 2025