भिवंडीत भंगारच्या गोदामाला भीषण आग लागून आगीत सहा ते सात दुकाने जळून खाक झाली आहेत. खंडुपाडा परिसरात रविवारी पहाटे 4.30 ते 5 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आगीची माहिती मिळतात अग्नीशमन दलाच्या तीन गाड्या आणि स्थानिक पोलीस घटनासथळी दाखल झाले. अग्नीशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले.
ज्वलनशील पदार्थांमुळे आजूबाजूच्या दुकानांमध्ये आग पसरली. यात फर्निचर गोदाम गॅरेजसह सहा ते सात दुकाने जळाली. आग विझवण्यासाठी स्थानिक नागरिकही अग्नीशमन दलाच्या मदतीसाठी धावले.