पगार वाढ आणि दंड आकारण्याच्या विरोधात आज सकाळपासून ठाणे परिवहन सेवेच्या सुमारे 700 चालक आणि वाहकांनी बेमुदत संप पुकारला आहे. त्यामुळे कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे, शाळकरी विद्यार्थ्यांचे, प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आनंद नगर TMT डेपोमधील कंत्राटी चालक आणि वाहकांनी पगार वाढ आणि दंड आकारण्याच्या विरोधात आज सकाळपासून बेमुदत संप पुकारला आहे. आनंद नंगर डेपोतून ठाणे, कळवा आणि मुंब्रा येथील विविध भागांमध्ये बसफेऱ्या होतात. लाखोंच्या संख्येने दररोज प्रवासी या मार्गावर प्रवास करततात. परंतु अचानक कर्मचाऱ्यांनी बंद पुकारल्याने कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची तारांबळ झाली. त्याच बरोबर विद्यार्थ्यांना सुद्धा शाळेमध्ये आणि कॉलेजमध्ये जाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.