![bhiwandi crime](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/bhiwandi-crime-696x447.jpg)
लग्नानंतर हुंडा आणला नाही म्हणून शिक्षिकेचा मानसिक व शारीरिक छळ केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिक्षकेने नारपोली पोलीस ठाण्यात पती दीपक मालकर, आरती घाटे व राज कदम या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या तिघांनीही तिला हुंड्यासाठी मानसिक छळ करत कंबर पट्ट्याने बेदम मारहाण केली. तसेच ठार मारून खाडीत फेकून देण्याची धमकी दिल्याचा आरोप शिक्षिकेने केला आहे. सासरच्या मंडळींच्या जाचाला कंटाळून अखेर शिक्षिकेने पोलीस ठाण्यात धाव घेत तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.