
ठाणे महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असतानाही आयुक्त सौरभ राव यांनी 5 हजार 645 कोटींच्या आकडय़ांची ‘हेराफेरी’ करत 2025-26 चा अर्थसंकल्प आज सादर केला. सरकारने लटकवलेले तीन हजार कोटींचे अनुदान, 65 कोटींच्या कर्जाचा डोंगर, ठेकेदारांची रखडलेली 1 हजार 194 कोटींची देणी यामुळे पालिकेची अर्थव्यवस्था कोमात गेली आहे. आयुक्त राव यांनी गेल्या वर्षीपेक्षा यंदाचा अर्थसंकल्प 620 कोटींनी फुगवला असला तरी आर्थिक तरतूद केलेल्या योजनांसाठी पैसे आणायचे कुठून याचे विविध खातेप्रमुखांना टेन्शन आले आहे. त्यामुळे हा अर्थसंकल्प नव्हे तर ‘व्यर्थ संकल्प’ असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.