ठाण्याचे पहिले नगराध्यक्ष ज्येष्ठ शिवसैनिक सतीश प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ शिवसैनिक आणि ठाण्याचे पहिले नगारध्यक्ष सतीश प्रधान यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. प्रधान हे ठाणे नगरपालिकेचे पहिले नगराध्यक्ष होते. लोकसभा, राज्यसभा खासदार आणि महापौर अशी अनेक पदं त्यांनी भूषवली होती. ठाण्याचे पहिले महापौर अशी त्यांची ओळख होती. रविवारी दुपारी 2 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेच्या जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या निधनाने ठाण्यात राजकीय पोकळी निर्माण झाली आहे.