ठाण्यातील गोळीबार प्रकरण : गणपत गायकवाड यांच्या फरार मुलाला क्लीनचिट

उल्हासनगरातील हिललाईन पोलीस ठाण्यात गेल्या वर्षी झालेल्या गोळीबार प्रकरणात कोणतेही ठोस पुरावे मिळाले नसल्याने भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड यांचा फरार मुलगा वैभव गायकवाड याला क्लीनचिट देण्यात आली आहे. ठाणे क्राईम ब्रँचने उल्हासनगर न्यायालयात याबाबतची पुरवणी चार्जशीट दाखल केली आहे.

फेब्रुवारी २०२४ मध्ये हिललाईन पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या दालनात भाजपचे तत्कालीन आमदार गणपत गायकवाड यांनी जमिनीच्या वादातून मिंधे गटाचे पदाधिकारी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. याप्रकरणी गणपत गायकवाड यांच्यासह अन्य दोन आरोपी तळोजा जेलमध्ये आहेत. गोळीबार झाल्यापासून वैभव फरार आहे. या प्रकरणाची पुरवणी चार्जशीट पोलिसांनी नुकतीच उल्हासनगरच्या न्यायालयात सादर केली आहे. या चार्जशीटमध्ये नागेश बडेराव आणि कुणाल पाटील या दोन आरोर्षीचा समावेश असून यातून वैभवचे नाव वगळले आहे.

क्राईम ब्रँचचे म्हणणे काय?

वैभव गायकवाड गोळीबारात सहभाग असल्याचे कोणतेही ठोस पुरावे आढळून आलेले नाहीत, असे क्राईम ब्रँचचे म्हणणे आहे. गोळीबार होण्यापूर्वी वैभव पोलीस ठाण्याच्या बाहेर पडला होता हे सीसीटीव्हीतून स्पष्ट होत असल्यामुळे चार्जशीटमधून त्याचे नाव वगळण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली