कल्याणमधील सामाजिक कार्यकर्त्या विमल भोईर यांचे बुधवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्या 67 वर्षांच्या होत्या. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी शहरप्रमुख व माजी स्थायी समिती सभापती चंद्रकांत भोईर यांच्या त्या पत्नी होत्या. तसेच पत्रकार अतिश भोईर आणि विधानसभा सहसंघटक रुपेश भोईर यांच्या त्या मातोश्री होत्या.
विमल भोईर या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. बैलबाजार येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सामाजिक, राजकीय आणि पत्रकारिता आदी क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. विमल भोईर यांच्या पश्चात तीन मुले, मुलगी, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे.