पालघर मनसेचे जिल्हाध्यक्ष समीर मोरे आणि त्यांचे बंधू अतिश मोरे यांच्यावर हल्ला केल्या प्रकरणात मनसेचे ठाणे पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांच्यासह 11 जणांवर सातपाटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समीर मोरे यांच्या भावावर काही गुंडांनी लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केला. मनसे ठाणे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांच्याकडून हल्ला करण्यात आल्याचा मोरे कुटुंबीयांचा आरोप आहे. पालघर जिल्हाध्यक्ष समीर मोरे यांचे भाऊ अतिश मोरे यांच्यावर बोईसरमधील शगुन रुग्णालयात उपचार सुरू आहे.
मनसे नेते अविनाश जाधव यांनी निवडणूक काळात दिलेली जबाबदारी पार पाडली नसल्याची तक्रार काही मनसे पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांनी केली. पदाधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर राज ठाकरे यांनी अविनाश जाधव यांची कानउघाडणी केली आणि हाच राग मनात धरून अविनाश जाधव यांनी हा हल्ला केल्याचा आरोप मोरे कुटुंबीयांनी केला आहे.