Thane crime news – जीन्सची ट्रायल घेताना तरुणीला चोरून पाहिले; टेलरला जमावाने चोप चोप चोपले

जीन्स ट्रायल करत असताना लपून बघणे टेलरला चांगलेच महागात पडले आहे. याबाबत तरुणीने आजूबाजूच्या दुकानदारांना घडलेल्या प्रकाराची माहिती देताच ग्राहकांनी या ठिकाणी धाव घेत टेलरला जाब विचारला. मात्र त्याने मग्रुरी करताच जमावाने त्याला रस्त्यावर फरफटत आणत चांगलाच चोप दिला. पोलिसांनी याप्रकरणी टेलरला अटक करतानाच मारहाण करणाऱ्या सहा जणांनाही ताब्यात घेतले आहे.

कॅम्प नंबर 3 मधील रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या कपडे बाजारात अल्टरेशन दुकान आहे. या दुकानात एक तरुणी अल्टरेशनला दिलेली जीन्स घ्यायला सायंकाळच्या सुमारास गेली होती. ही तरुणी जीन्स ट्रायल करत असताना टेलरने बघितल्याचा तरुणीचा आरोप आहे.

विनयभंग झालेल्या तरुणीने बाजूलाच असलेल्या के. पी. कलेक्शन या दुकानात धाव घेत घडलेला प्रसंग तेथील दुकानदाराला सांगितला. त्यावेळी तिथे खरेदी करायला आलेल्या ग्राहकांनी जाब विचारण्यासाठी टेलरचे दुकान गाठले. यावेळी या टेलरला रस्त्यावर ओढून बेदम चोप दिला.

ही घटना माहिती पडताच मध्यवर्ती ठाण्याचे दोन बीट मार्शल पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही पोलिसांनी जमावापासून टेलरला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रक्षोभक झालेल्या जमावाने पोलिसांना ही जुमानले नाही. अखेर अतिरिक्त पोलीस बल आल्यानंतर जखमी टेलरला मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करून अटक केली. टेलरला बेदम चोप देणाऱ्या महिलेसह ६ जणांनाही ताब्यात घेतले.