खासगी बँकेच्या अधिकाऱयाने बँकेच्या राखीव निधीवर डल्ला मारल्याची घटना समोर आली आहे. त्याने पदाचा वापर करून दोन कोटी रुपये नातेवाईकाच्या खात्यावर वळते केले आहेत. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
अंधेरी पूर्व परिसरात एक खासगी बँक आहे. त्या बँकेत तक्रारदार हे वरिष्ठ अधिकारी म्हणून काम करतात. बँकेची एपूण सहा खाती आहेत. त्या खात्यांमध्ये विविध कामांसाठी लागणाऱया निधीचा वापर केला जातो. त्या खात्यातील निधी वापरण्यासाठीचे अधिकार बँक अधिकाऱयांना आहेत. 3 एप्रिल ते 4 नोव्हेंबर 2024 या काळात बँकेच्या खात्यातून 2 कोटी पाच लाख रुपये विविध खात्यांमध्ये वळते झाल्याचे दिसले. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने बँक अधिकाऱयाने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.