जगाच्या कानाकोपऱ्यात खाल्ले जाणारे पदार्थ वेगवेगळे असून त्याची चवसुद्धा वेगळी असते. परंतु, टेस्ट एटलॉसने नुकताच एक अहवाल जारी केला असून यानुसार, जगात सर्वात भारी ब्रेडमध्ये रोटी कनई आहे. रोटी कनईला नंबर वनचे स्थान मिळाले असून हिंदुस्थानातील बटर गार्लिक नानला जगात सर्वात चविष्ट असलेले दुसरे स्थान मिळाले आहे. याशिवाय, जगातील सर्वोत्तम ब्रेडमध्ये हिंदुस्थानातील 3 रोटींचा समावेशसुद्धा करण्यात आला आहे. यामध्ये बटर गार्लिक नान, अमृतसरी कुलचा आणि नान यांचा समावेश आहे. टेस्ट एटलॉस हा फ्लेवर्सचा विश्वकोष आहे. यात जगातील सर्वोत्तम पारंपरिक पदार्थ, स्थानिक पदार्थ आणि रेस्टॉरंटची नोंद केली जाते. या विश्वकोषात 10 हजारांहून अधिक खाद्यपदार्थ आणि पेयांचा समावेश करण्यात आला आहे.
जगातील टॉप 10 रोटी
रोटी कॅनई, बटर गार्लिक नान, पॅन डी बोनो, पाओ डे क्वेजो, नान-ए बार्बरी, अमृतसरी कुलचा, बकरखानी, नान, पियादिना रोमाग्नोला, बोलानी.