आता तुम्ही डोंगरातही बिनधास्त स्वतःच्या चारचाकीतून फेरफटका मारू शकता. ट्रेकिंग करणाऱ्यांना गाठू शकता. कारण टेस्ला कंपनीने चक्क डोंगर चढणारा सायबर ट्रक बाजारात आणला आहे. ही गाडी आता जगभरात रस्त्यांवर धावणार आहे. 3 वेगवेगळ्या व्हेरिएंट्समध्ये ही गाडी लाँच केली आहे.
सिंगल मोटर आरडब्ल्यूडीची बॅटरी असून एका चार्जमध्ये 250 मैल म्हणजेच तब्बल 400 किलोमीटरहून अधिक ही गाडी धावू शकणार आहे.
ताशी 100 किलोमीटरचा स्पीड पकडण्यासाठी केवळ 6.5 सेपंद लागतील. तर डय़ुअल मोटर एडब्ल्यूडी व्हेरीयंटची बॅजरी असेल तर एका चार्जमध्ये 480 किलोमीटरहून अधिक गाडी धावू शकेल. तसेच केवळ 4.5 सेकंदांत 0 ते 60 किलोमीटरची रेंज पकडता येईल.
टेस्ला सायबर ट्रकच्या ट्राय मोटर एडब्ल्यूडी व्हेरिएंटच्या बॅटरीची रेंज तब्बल 800 किलोमीटरहून अधिक असून केवळ 2.9 सेकंदांत ताशी 0 ते 100 किलोमीटरचा वेग पकडता येईल.