गुड न्यूज! टेस्ला कंपनीची मुंबईत नोकरभरती!!

अमेरिकेतील श्रीमंत उद्योगपती एलॉन मस्क यांच्या मालकीची टेस्ला पंपनी मुंबई आणि दिल्लीत नोकरभरती करणार आहे. टेस्ला पंपनीच्या कारची किंमत भरमसाट असल्याने या कार अद्याप हिंदुस्थानात दाखल झालेल्या नाहीत, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच अमेरिकेत मस्क यांची भेट घेतली आहे. त्यामुळे टेस्लाची एण्ट्री हिंदुस्थानात लवकरच होऊ शकते, असे बोलले जात आहे. टेस्लाने आता हिंदुस्थानात कर्मचाऱयांची भरती करण्यासाठी एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. टेस्लाच्या लिंक्डइन पेजवर ही जाहिरात दिसत असून मुंबई आणि दिल्लीत एपूण 13 जागा भरल्या जाणार आहेत, असे जाहिरातीत म्हटले आहे.

मस्क आणि हिंदुस्थान सरकार यांच्यात वाहनांच्या किमतीवरील शुल्क कमी करण्यावरून वाद होते, परंतु आता पेंद्र सरकारने आता 40 हजार डॉलर्सपेक्षा जास्त किमतीच्या वाहनांवरील मूळ सीमाशुल्क 110 टक्क्यांवरून 70 टक्क्यांपर्यंत कमी केले आहे. त्यामुळे टेस्लाचा हिंदुस्थानात येण्याचा मार्ग सोपा झाला आहे.