अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या लास वेगास येथील हॉटेलबाहेर बुधवारी सायबर ट्रकचा स्फोट झाल्याची घटना घडली. फटाके वाहून नेत असताना टेस्ला सायबर ट्रकला आग लागली आणि त्याचा मोठा स्फोट होऊन एकाचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाले. स्पह्ट झालेल्या वाहनाच्या मागच्या बाजूला फायरवर्क मोर्टार आणि कॅम्प फ्युअल पॅनिस्टर भरल्याचे आढळून आले. त्यामुळे हा दहशतवादी हल्ला आहे का, या शक्यतेचा कसून तपास केला जात आहे.