अमेरिकेचे निर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या लास वेगास येथील हॉटेलच्या बाहेर बुधवारी सायबर ट्रकचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये एक जण ठार तर सात जण जखमी झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या घटनेची माहिती दिली असून तपास अधिकारी हा स्फोट कसा झाला याचा तपास करत आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी सांगितले की, लास वेगासमधील ट्रम्प हॉटेलच्या बाहेर सायबर ट्रकच्या स्फोटावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. कायद्याची अंमलबजावणी आणि गुप्तचर संस्था देखील न्यू ऑरलियन्समधील हल्ल्याशी संभाव्य संबंध आहे का याचा तपास करत आहेत. न्यू ऑरलियन्समधील स्थानिक कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी तपास त्वरीत पूर्ण करण्यासाठी आणि अमेरिकन लोकांना कोणताही धोका नाही याची खात्री करा असे आदेश दिले आहेत. लास व्हेगासचे शेरीफ केविन मॅकमाहिल यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, वाहन स्फोटापूर्वी ट्रम्प इंटरनॅशनल हॉटेलच्या प्रवेशद्वारावर पोहोचले. व्हिडिओ फुटेजमध्ये हॉटेलच्या प्रवेशद्वारावर उभ्या असलेल्या स्टेनलेस स्टीलच्या ट्रकला आग लागल्याचे दिसले, त्यानंतर फटाक्यांसारखे छोटे स्फोट झाले.
याप्रकरणी मॅकमहिल म्हणाले की, सायबर ट्रकमध्ये एक व्यक्ती मृत अवस्थेत होता तर सात जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांनी बुधवारी लास वेगासमधील ट्रम्प इंटरनॅशनल हॉटेलच्या बाहेर सायबरट्रकचा स्फोट आणि यापूर्वी अमेरिकेच्या न्यू ऑर्लियन्समध्ये गर्दीत ट्रक घुसवल्याच्या घटनेत 15 जणांचा मृत्यू झाला असून या प्रकरणाचा दहशतवादी हल्ला म्हणून तपास केला जात आहे. या घटनेच्या काही तासांतच सायबर ट्रकचा स्फोट झाला आहे.दोन्ही वाहने एकाच कार रेंटल साइट टूरोवरून भाड्याने घेतल्याचे त्यांनी सांगितले. सायबर ट्रकमध्ये ठेवलेल्या बॉम्बमुळे हा स्फोट झाल्याचे मस्क यांनी सांगितले
सायबर ट्रक बनवणाऱ्या टेस्ला या कार कंपनीचे सीईओ एलॉन मस्क यांनी बुधवारी दुपारी एक्स वर माहिती दिली की, हे एक दहशतवादी कृत्य असू शकते असे दिसते. हा सायबर ट्रक आणि न्यू ऑर्लियन्समधील एफ-150 आत्मघाती बॉम्बर हे दोघेही टुरोकडून भाड्याने घेतले होते. ते कोणत्या ना कोणत्या मार्गाने जोडले गेले असावेत, याचा तपास केला जाईल.
टेस्लाच्या सीईओने ट्विटरवर स्पष्ट केले की हा स्फोट सायबर ट्रकमध्ये ठेवलेल्या बॉम्बमुळे झाला होता, वाहनानेच नाही.