
जम्मू-काश्मीरमधील कठुआ येथे दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये गुरुवारी चकमक झाली. या चकमकीत तीन दहशतवाद्याचा खात्मा झाला आहे. तर दहशतवाद्याचा खात्मा करणारे तीन पोलीस कर्मचारी शहीद झाले. सकाळपासून सुरू असलेल्या चकमकीत डीएसपी धीरज सिंह यांच्यासह पाच सुरक्षा कर्मचारी जखमी झाले. त्यापैकी तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तारिक अहमद, जसवंत सिंग, बलविंदर सिंग अशी तीन शहीद जवानांची नावे आहेत.
राजबागच्या घाटी जुठाणा भागातील जाखोले गावाजवळ ही चकमक सुरू आहे. येथे सुमारे 9 दहशतवादी लपून बसल्याचे वृत्त आहे. एसओजी, लष्कर, बीएसएफ आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने तीन दहशतवाद्यांना ठार केले. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सुरक्षा दलांनी थर्मल इमेजिंग, ड्रोन, हेलिकॉप्टर, बुलेटप्रूफ वाहने आणि स्निफर डॉगचा वापर करून मोठ्या प्रमाणात शोध मोहीम सुरू केली आहे.