जम्मू कश्मीरमध्ये सुट्टीवर आलेल्या जवानावर दहशतवादी हल्ला, पायावर मारली गोळी

जम्मू कश्मीरमध्ये जवानावर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात एक जवान जखमी झाला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

पुलावामामध्ये अवंतीपुरा भागात एक जवान सुटी घेऊन घरी आला होता. तेव्हा दहशदवाद्यांनी या जवानावर गोळीबार केला. तेव्हा या जवानाच्या पायावर गोळी लागली. जखमी जवानाला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमी जवानाची तब्येत स्थिर आहे.