गेल्या काही वर्षांत जीएसटी नियमांमध्ये वेगवेगळय़ा सुधारणा करण्यात आल्या आहेत. नवीन दुरुस्तीनंतर आता निवासी मालमत्तांवर राहणाऱया भाडेकरूंनाही 18 टक्के जीएसटी भरावा लागणार आहे. जीएसटीच्या नियमांनुसार पूर्वी व्यावसायिक मालमत्तेवर कार्यालय किंवा किरकोळ जागा भाडय़ाने, लीजने देण्यावर जीएसटी लागू होता. मात्र नव्या नियमांनुसार निवासी मालमत्तांवर राहणाऱया भाडेकरूंनाही जीएसटी भरावा लागणार आहे. केवळ अशा भाडेकरूंना जीएसटी भरावा लागेल जे भाडय़ाचे घर व्यवसायासाठी वापर करत आहेत. म्हणजे जर एखादा भाडेकरू निवासी मालमत्ता भाडय़ाने घेऊन व्यवसाय चालवत असेल तर त्याला 18 टक्के जीएसटी भरावा लागेल. नियमांनुसार, भाडेकरूला रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम म्हणजेच आरसीएमअंतर्गत कर भरावा लागेल. ज्यावर नंतर दावा करू शकतो, परंतु भाडय़ाच्या जागेचा वैयक्तिक कारणांसाठी वापर केला जात असेल तर जीएसटी लागू होणार नाही.
जीएसटी कधी लागू होणार नाही?
l भाडेकरू जीएसटी नोंदणीकृत नसेल तर 18 टक्के जीएसटी भरावा लागणार नाही.
l भाडेकरू जीएसटी नोंदणीकृत आहे, परंतु निवासी मालमत्ता वैयक्तिक वापरासाठी वापरत असल्यास जीएसटी लागू होणार नाही.
l भाडेकरू जीएसटी नोंदणीकृत आहे आणि व्यवसायासाठी निवासी मालमत्ता वापरत असल्यास भाडय़ावर 18 टक्के जीएसटी भरावा लागेल.